शिपोशी :

शिपोशी शाखेचे मूळ पुरुष विश्वनाथ भट्ट, केशव भट्ट, आठल्ये हे होत. त्यांना पुत्र पंच ते १) रुद्रभट २) बालंभट ३) सिंदभट ४)रामभट ५)बाबणभट असे होते. हेच शिपोशीतील पाच तक्षिमांचे मूळ पुरुष होत. त्यांना दि. १ जून १७१९ रोजी श्रीमत् शंभू छत्रपती, करवीर यांचेकडून शिपोशी गाव इनाम मिळून तशी सनदही मिळाली. त्यानंतर दि. ११ नोव्हेंबर १७२० रोजी श्रीमत् शाहू छत्रपती, सातारा यांचेकडूनही त्याच गावची इनामाची सनद मिळाली व वडील बंधू रुद्र भटजी यांचे नावे या दोन्ही सनदा होऊन त्या पंच बंधूस शिपोशी गाव इनाम मिळाला. त्यानंतर इ.स. १७२५ चे सुमारास ते शिपोशी येथे राहावयास आले.

 

शिपोशीला कसे पोचाल?

रस्त्याने

१)      आपण मुंबई ते शिपोशी हा प्रवास आपल्या स्वत:च्या गाडीने करीत असल्यास मुंबई वरून शिपोशीला येण्याकरिता मुंबई-गोवा महामार्गाचा अवलंब करावा. या मार्गाने संगमेश्वर येथे आल्यावर देवरुख मार्गे साखरपा येथे यावे मुंबई ते साखरपा हे अंतर ३३१ किमी आहे.त्यानंतर साखरपा रत्नागिरी मार्गावरील दाभोळे या गावी यावे त्यानंतर दाभोळे वाटुळ या मार्गावर ५ किमी अंतरावर शिपोशी हे गाव लागेल तेथून १.५ किमी आत आल्यावर आपणास मंदिराजवळ पोहोचता येइल.

२)      आपण पुणे ते शिपोशी हा प्रवास आपल्या स्वत:च्या गाडीने करीत असल्यास पुण्या वरून शिपोशीला येण्याकरिता पुणे मलकापूर मार्गे साखरपा  या मार्गाचा अवलंब करावा. या मार्गाने साखरपा येथे यावे पुणे ते साखरपा हे अंतर २६० किमी आहे. त्यानंतर साखरपा रत्नागिरी मार्गावरील दाभोळे या गावी यावे त्यानंतर दाभोळे वाटुळ या मार्गावर ५ किमी अंतरावर शिपोशी हे गाव लागेल तेथून १.५ किमी आत आल्यावर आपणास मंदिराजवळ पोहोचता येइल.

 

रेल्वेने

 

३)      मुंबई ते शिपोशी हा प्रवास आपणास रेल्वेने करावयाचा असल्यास मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास आपणास रेल्वेने करावा लागेल व त्यानंतर रत्नागिरी ते शिपोशी हा ५० किमी चा प्रवास आपणाला एस.टी.ने करावा लागेल.शिपोशी बसथांब्यावर उतरल्यानंतर १.५ किमी आत आल्यावर आपणास मंदिराजवळ पोहोचता येइल.